आपल्यापैकी प्रत्येकाला पोटात गॅस होण्याच्या समस्येचा (Stomach Gas Problem) अनुभव आतापर्यंत अनेक वेळा आला असेल.
![]() |
| Stomach Gas Problem |
Stomach Gas Problem in Marathi
पोटदुखीच्या अनेक कारणांमधील सर्वात जास्त व एक मुख्य कारण म्हणचे पोटात अधिक अॅसिड म्हणजेच गॅस (More Gas in Stomach) निर्माण होणे. याला गॅस्ट्रिक पेन असं देखील खूपवेळा म्हटलं जातं. पोटात जास्त प्रमाणात गॅस (Excess Gas In Stomach) होण्याची समस्या ही साधारणत: भराभर जेवणे, अधिक प्रमाणात Carbonated Drinks पिणे किंवा Oily Fast Food खाल्ल्यामुळे होते.
अनेक लोकांना असं बऱ्याच वेळेला वाटतं की उशीरा जेवल्यामुळे त्यांच्या पोटात अधिक अॅसिड म्हणजेच गॅस (More Gas in Stomach) ची समस्या निर्माण होत आहे पण प्रत्यक्षात यामागे तुम्ही कोणत्या प्रकारचे अन्न खाता किंवा तुम्हाला एखादा असलेला विशिष्ट विकार किंवा अगदी तुमची धूम्रपानाची सवय देखील कारणीभूत असू शकते.
पोटात गॅस (Stomach Gas Problem) होणे आणि त्याची दुर्गंधी येण्याचे मूख्य कारण म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित न होणे असून आपण ह्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. बहुतांश लोकांना Stomach Gas Problem ची समस्या खूप वेळा होत असते.
वेळीच या गोष्टीकडे लक्ष न दिल्यास पोटाचे आजार (Stomach problem) होण्याची शक्यता जास्त प्रमाणात होण्याची संभावना जास्त असते. ज्या व्यक्तीला Stomach Gas Problem चा जास्त त्रास आहे, तो व्यवस्थित हे अगदी समजू शकतो.
जर stomach gas जास्त वेळ रोखून ठेवला आणि चारचौघात याचा स्फोट झाला तर आणखी पंचाईत होते. पण हे वाचून कदाचित तुम्हाला हसू आवरत नसेल पण जर आपण काही ठराविक नियम पाळले तर stomach gas ची समस्या दूर ठेवू शकतो.
पोटात गॅस (Stomach Gas Problem) होणे ही समस्या अनेक लोकांना खूप वेळेला होत असते. याचे मुख्य कारण म्हणजे अवेळी जेवण करणे, जेवताना अन्न नीट चावून न खाणे, भूक लागलेली नसताना काहीतरी अरबट चरबट खाणे, रात्री जास्त वेळ जागे राहणे तसेच जेवताना खूप पाणी पिणे तसेच मानसिक तणाव असल्यावरही पोटात गॅस (Stomach Gas Problem) होण्याचा त्रास होऊ शकतो.
पोटातील गॅस (Stomach Gas), दुर्गंधी घालवण्यासाठी अनेक औषधोपचार आज बाजारात उपलब्ध आहेत. अशाप्रकारचे औषधोपचार, हे काही काळासाठी फायद्याचे ठरू शकतात. म्हणून पोटातील गॅसच्या (Stomach Gas) समस्येचा नायनाट करण्यासाठी घरातील आयुर्वेदिक वस्तूंचा वापर करुन पोटातील गॅस (Stomach Gas) ची समस्या दूर करता येवू शकते.
पोटात गॅस निर्माण होण्यामागची सामान्य कारणे (Common causes of Stomach gas problem)
१.हाय-फायबर डाएट (High-fiber diet)
तसे पाहायला गेले तर हाय-फायबर डाएट (High-fiber diet) असलेले खाद्यपदार्थ आरोग्यासाठी चांगले असून त्यामुळे गॅस्ट्रोइनटेस्टीनल समस्या टाळल्या जातात. मात्र या पदार्थांचे अति सेवन केल्यास तुमच्या पोटात गॅस (Stomach Gas) निर्माण होऊ शकतो.
२. फास्ट फूड :- (Fast Food)
बाहेरचे अन्न किंवा जंक फूड (Junk Food) खाणे हे पोटात अतिरिक्त गॅसचे (More stomach gas) मोठे कारण आहे. पिझ्झा, बर्गर, सँडविच हे पदार्थ खायला खूप छान लागतात आणि हे पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप लोकांना आवडतात, पण ज्या लोकांना digestion problem असतो, त्यांच्या पोटात जास्त प्रमाणात गॅस (stomach gas) तयार होऊ लागतो. मैद्यापासून बनवलेल्या या गोष्टी आपल्या शरीराचे खूप नुकसान करतात आणि हे पदार्थ पचायला देखील खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे गॅसची (stomach gas) समस्या निर्माण होते.
३. बॅक्टेरिया :- (Bacteria)
पोटातील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचे संतुलन हे नेहमीच राहायला हवे परंतु जर त्यांचे संतुलन बिघडले तर पोटात जास्त गॅस तयार (More stomach gas) होऊ लागतो. काही वेळा पोटात side effect झाला तरी जास्त प्रमाणात stomach Gas होऊ लागतो. लसूण, कांदे, बीन्स जास्त खाल्ल्यानंतरही Bacteria चे संतुलन बिघडते. त्यामुळे पोटात जास्त (More stomach gas) गॅसचा त्रास सुरू होतो.
४.साखरेचे पदार्थ- (Sugary foods)
पेस्ट्री,कुकीज, पॅकबंद फळांचा रस,स्विटेंडेड सोडा,मिठाई या गोड पदार्थांमुळे देखील पोटात जास्त गॅस (More stomach gas) होण्याचा त्रास होऊ लागतो.
![]() |
| More stomach gas |
५. बद्धकोष्ठता :- (Constipation)
जर आपल्याला Constipation ची समस्या असली तरी पोटात जास्त गॅस (More stomach gas) होऊ लागतो. जेव्हा पोटात शरीर अन्न पचवणारे विशिष्ट द्रव्य तयार करू शकत नाही, तेव्हा पोटात जास्त गॅस (More stomach gas) तयार होतो. या गॅसच्या (stomach gas) समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स (Detox) करण्यासाठी दररोज 8-10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे आणि आहारात Fibre चे प्रमाण वाढवले पाहिजे.
६ धूम्रपान- (Smoking)
जास्त प्रमाणात पोट फुगणे हा smoking मूळे होणारा एक side effect देखील आहे. यामागचे कारण smoking करणारी व्यक्ती जेव्हा smoking करते तेव्हा ती अति प्रमाणात बाहेरची हवा आत घेते ज्यामुळे smoking करणाऱ्या लोकांची अन्ननलिका,पोट किंवा मोठ्या आतड्यामध्ये जास्त प्रमाणात गॅस (More stomach gas) निर्माण होतो.
७.इरीटेबल बोवल सिन्ड्रोम - Irritable bowel syndrome (IBS)
इरीटेबल बोवल सिन्ड्रोम Irritable bowel syndrome (IBS) असलेल्या व्यक्तीच्या पोटात असह्य वेदना होणे,क्रॅम्प येणे व पोट फुगण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळतात. ही समस्या असलेल्या व्यक्तीला जर असह्य वेदना होणे,क्रॅम्प येणे व पोट फुगणे अशा प्रकारचे त्रास होत असतील तर त्याने त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरेल जेणेकरून त्याचा पोटातील अतिरिक्त गॅसचा प्रॉब्लेम (More stomach gas problem) लवकर ठीक होण्यास मदत मिळेल.
शरीरात जास्त प्रमाणात गॅस (More stomach gas problem) दोन प्रकारे तयार होतो. कॅनेडियन सोसायटी ऑफ इन्टेस्टाइन (Canadian Society of Intestine) रिसर्चच्या एका माहितीनुसार पोटात गॅस तेव्हा तयार होतो जेव्हा जेवताना शरीरात हवा प्रवेश करते. यामुळे शरीरात नायट्रोजन आणि ऑक्सिजन तोंडावाटे शरीरात जातो.
तर आपल्या शरीरात दुसऱ्या प्रकारे गॅस तेव्हा बनतो जेव्हा आपल्या अन्न पचवण्याच्या प्रक्रियेत हायड्रोजन, मीथेन, कार्बन डायऑक्साईड यासारखे गॅस शरीरात तयार होतात. या गॅसवर जर वेळीच उपाययोजना केली नाही तर ते आपल्या शरीरासाठी मोठे त्रासदायक ठरू शकते. मह्णूनच पोटातील जास्त गॅसच्या (More stomach gas problem) त्रासातून सुटका करून घेण्यासाठी आपण वेळीच घरगुती उपाय केलेले बरे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा